Election Update : धक्कादायक बदल! मतदानाला अवघे तास बाकी असताना राज्यातील ‘या’ तीन नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या; कारण नेमकं काय?

Election : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.

बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती. याशिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयानं भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्यानं निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने बारामतीत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अर्थात या प्रक्रियेमुळे बारामतीतील संबंधित सात ठिकाणी आणखी उमेदवार बिनविरोध होऊ शकतात अशी देखील चर्चा आता नव्याने जोर धरू लागली आहे.

Pune : पुण्यात वेश्या व्यवसाय आणि गांजा विक्रीचा धुमाकूळ; गुन्हेगारांना संरक्षण कोणाचं?

निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यामुळे यामुळे काही ठिकाणी प्रचाराची संधी तर काही ठिकाणी प्रचाराचा अतिरिक्त ताण उमेदवारांना सहन करावा लागणार आहे. बारामतीमध्ये तर वाढवलेली मुदत ही डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. बारामतीतील प्रचाराची बहुतेक पूर्ण तयारी झालेली होती. आज म्हणजे रविवारी बारामतीतील प्रचाराची सांगता देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार होती. मात्र, आता निवडणूक पुढे गेल्याने प्रचार देखील पुढे गेला आहे.

महाबळेश्वर आणि फलटणनंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयानं दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत. त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *