
Maharashtra Karnataka Border Issue : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर आपला दावा केल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच या वादात महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगावमध्ये हल्ला करण्यात आला. याला प्रत्त्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कर्नाटकातील बसेवर काळं फासण्यात आलं. यावरून दोन्ही राज्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, आज कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात महाराष्ट्राविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. इतकंच नाही तर, त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देखील दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आहे. पण त्यांच्यात दम नाही, असं कन्नड रक्षण वेदिकेने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील लोकांमध्ये दम असेल तर इकडे येऊन दाखवावं, नाहीतर आम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येतो, आणि काय करू शकतो ते दाखवतो, असं थेट आव्हानच कन्नड रक्षण वेदिकेने दिलं आहे. आज बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्रविरोधात मोर्चा काढला होता. तेथील स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेला सीमावाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहचला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर थोड्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलं.
दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्याबद्दल कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाईल, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. दरम्यान, आता कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारला थेट आव्हानच दिल्याने हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

