Maharashtra Jails : महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे होण्यासाठी प्रयत्नशील - अमिताभ गुप्ता

पुणे - महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी कारागृह विभागातील अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

कारागृहात विविध गुन्ह्यातील बंद्यांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा कसे पाठवता येईल, यासाठी कारागृह विभाग हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य ‘सुधारणा व पुनर्वसन’ असे आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महासंचालक गुप्ता यांनी मंगळवारी (ता. १७) राज्यातील सर्व कारागृहांचे उपमहानिरीक्षक आणि सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक घेतली.

कारागृहातील बंद्यांना कायद्यानुसार ज्या सोयी-सुविधा देणे बंधनकारक आहे त्या सुविधा देण्यात याव्यात. तसेच, जे निर्बंध आहेत, त्याचेही काटेकोर पालन करावे. बंद्यांची वैद्यकीय चाचणी नियमितपणे करण्यात यावी. बंद्यांच्या आहारातील अन्नधान्य हे खाण्यायोग्य प्रतीचे असावे. तसेच, महिला बंद्यांना ठेवण्यात येणाऱ्या कारागृहांमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत पाळणाघर सुरू करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply