Maharashtra HSC result 2024 : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी; ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Maharashtra HSC result 2024 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे.

बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दुपारी १ वाजता पाहू शकतात.

Pune Car Accident : पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!

महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिली. बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २३ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला.

बारावीच्या परीक्षेत एकूण ९५.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात यंदा कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply