Maharashtra Girls Missing : धक्कादायक! राज्यात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता; धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Girls Missing : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आहे, असे दावे राज्यकर्त्यांकडून वारंवार केले जातात. मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीवरुन मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? असा सवालही रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे," असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply