गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना तीन महिने तुरुंगवास? विधी व न्याय विभागाकडे राज्य सरकारचा प्रस्ताव

मुंबईः महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपली उज्ज्वल इतिहासाची परंपरा आहे. परंतु या गडकिल्ल्यांवर काही लोक मद्यपान करतात तर काही विकृत चाळे करतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. आज सभागृहात बोलतांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्राचा इतिहास हा शूरांच्या शौर्याने गाजलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारुन इथल्या जनतेला हक्काचं राज्य दिलं. गडकिल्ले हे शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात. मात्र आजचे काही गुलहौशी लोक गडकिल्ल्यांच्या पावित्र्याला बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना रोखण्यासाठी काही संघटना, समाजसेवी संस्था काम करतात. परंतु थेट कायद्यात तशी तरतूद नाहीये.

याच अनुषंगाने आज विधीमंडळामध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विषय मांडला. राज्य सरकार विधी व न्याय विभागाला प्रस्ताव देणार असून कायद्यातील तरतूदींसंदर्भात मार्गदर्शन मागवणार आहे. त्यानंतर केंद्राकडे हा कायदा मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

या काद्यांतर्गत गडकिल्ल्यांचं मद्यपान करुन पावित्र्य भंग करणाऱ्यांना तीन महिने तुरुंगवास आणि १० हजारांचा दंड होऊ शकतो. यासोबतच प्रत्येक किल्ल्यावर हेरिटेड मार्शल देणार असल्याचंही मुंनगंटीवार यांनी सांगितलं.

काय म्हणाले मुनगंटीवार?

आपल्या गडकिल्ल्यांनी वीररस बघितला आहे, तिथे लोक सोमरस पित बसतात. यासंदर्भात विधी व न्याय विभागाला प्रस्ताव देण्यात येणार असून कायद्यामध्ये कशा तरतूदी करता येतील, याचं मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे. केंद्राला विनंती करुन कमीत कमी ३ महिने शिक्षा आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद करण्यासंदर्भात विनंती करण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply