Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात

Maharashtra Vidhan Sabha Election Result News : सुरुवातीच्या कलानुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेय. ११ वाजेपर्यंतच्या कलामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसतेय. महायुतीचे उमेदवार सध्या २१८ जागांवर आघाडीवर आहेत. विशेषकरुन एकटा भाजप पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआला जोरदार धक्का बसला आहे.

२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल समिश्र आले होते. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मविआ तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती सत्ते येईल, असा दावा केला होता. महायुतीने सर्व एक्झिट पोल फोल ठरत २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये कुणीही सत्तेत आले तर १६० पर जाईल, असा अंदाज वर्तवला होता.

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

महायुतीची जोरदार मुसंडी -

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. महायुतीने तब्बल २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ५४ आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर आघाडीवर आहे.

मविआ ५० वर अडकली -

लोकसभेला भरघोस यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र मोठा झटका बसला आहे. महायुतीने जोरदार कमबॅक करत दोनशेचा आकडा पार केलाय. ११ वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, मविआ फक्त ५१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २०, ठाकरेंची शिवसेना १८ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार १३ जागांवर आघाडीवर आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply