Maharashtra Crime : उरणमध्ये खळबळ! भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन तरूण घुसला अन्…

image

अन् मोठा अनर्थ टळला

तरूणाच्या हातात कोयता पाहिल्यानंतर बंगल्यात असणाऱ्यांनी तात्काळ उरण पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत तरूणाला ताब्यात घेतले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील कोयता जप्त केला. या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी अशा प्रकारे सशस्त्र व्यक्तीने शिरकाव केल्यामुळे उरणमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *