Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून 'नमो शेतकरी महासन्मान योजने'ची घोषणा; सविस्तर जाणून घ्या

मुंबई :. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात

फडणवीस म्हणाले, "अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत शासनाच्या अनुदानाची भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो"

काय आहे ही योजना?

या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६,००० रुपयांत राज्य सरकार आणखी ६,००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना १२,००० रुपये प्रतिवर्षी मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

यासाठी २०२३-२४ साठी ६,९०० कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. केंद्र सरकारनं २०१६च्या पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यानं भरण्याची तरतूद आहे. आता हा भारही शेतकर्यावर न ठेवता त्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य शासन भरेल. शेतकऱ्याला केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नोंदणी करता येईल, असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply