Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर ! आचारसंहिता लागू, प्रचाराचा धुराळा, सध्या कुणाची ताकद किती?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात आजपासून राजकीय धुराळा उडणार आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. २८८ विधानसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता घोषणा करण्यात येणार आहे. राज्यात महायुती आणि मविआ यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. लोकसभेला मविआने महायुतीला जोरदार धक्का दिला होता. पण लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलेलं दिसत आहे. लाडकी बहीण योजना, टोलमाफी यासारख्या निर्णायाचा महायुतीला फायदा होईल, असे म्हटले जातेय. राज्यात २८८ जागांवर सध्या महायुतीचं प्राबल्य आहे, पण लोकसभेतील निकालानंतर मविआची ताकदही वाढली आहे. त्यामुळे लढत चुरशीची होईल, असा अंदाज आहे.

महायुती आणि मविआमध्ये जागावाटपचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय, पण अद्याप शंभर टक्के जागावाटप झाल्याचं दिसत नाही. त्यांच्यातील तिढा दिल्लीच्या दरबारी पोहचलाय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

Sambhajiraje Chatrapati : शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही; संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर ठाकरे आणि शरद पवार यांनाही सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस ११०, ठाकरे ९० ते १०० आणि शरद पवार ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. पुढील आठवड्यात जागावाटपाबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

विधानसभेच्या एकूण जागा २८८

महायुतीकडे सध्या १८७ जागा

भाजप - १०५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०

राष्ट्रवादी (अजित पवार) -४२

महाविकास आघाडी ७२ जागा -

काँग्रेस - ४४

शिवसेना ठाकरे गट - १६

राष्ट्रवादी शरद पवार - १२

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply