Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला वेग? उद्धव ठाकरे अचानक पोहचले राज ठाकरेंच्या शिवतिर्थावर

Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा शिवतीर्थवर गेले आहेत.

गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब गेले होते. गणपतीनंतर उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा शिवतीर्थवर आले आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते शिवतीर्थवर आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील आहेत. या भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा होत आहे.

याआधी गणेशोत्सवात ठाकरे बंधूंची झालेली भेट ही कौटुंबिक भेट होती. २२ वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. आता १० दिवसांनंतर ते पुन्हा राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले असून दोघेही आता राजकीयदृष्ट्या एकत्रित येणार असल्याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. या भेटीमुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *