Maharashtra : हृदय पिळवटणारी घटना, मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी संपवले जीवन, धावत्या मालगाडीसमोर घेतली उडी

Maharashtra : उल्हासनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी धावत्या मालगाडीसमोर उडी घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंजीत सिंग असे आयुष्य संपवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबईच्या दिशेने मालगाडी जात असताना उल्हासनगर स्टेशनवर मंजीत सिंग यांनी मालगाडीच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलेय.

उल्हासनगर रेल्वे स्थानकावर मंजीत सिंग (वय 65) या वृद्धाने धावत्या मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही आत्महत्या त्यांच्या मुलीच्या वाढदिवशी घडल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मंजीत सिंग हे एका कंस्ट्रक्शन साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत होते. अत्यंत शांत, कष्टाळू आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजूनही समजलेलं नाही. कल्याण लोहमार्ग पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीखाली उडी घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घरात वाढदिवसाच्या तयारीचा उत्साह असतानाच मृत्यूचं हे झणझणीत वास्तव समोर आलं आणि आनंद दुःखात बदलला. सिंग यांच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, "बापच आपल्या लेकीच्या वाढदिवशी अशी अखेरची आठवण मागे ठेवून जाईल?" हा प्रश्न काळजात घर करून बसला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *