Maharashtra : बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

Maharashtra : रात्रीच्या सुमारास एका तरूणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरूण बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. २ दिवसांपूर्वी कामावर गेला. मात्र, तो काही घरी परतलाच नाही. तरूणाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही घटना नागपूर येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पारडी पोलीस घेत आहेत.

सतीश मेश्राम (वय वर्ष ३१) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो नागपुरातील भांडेवाडी परिसरातीस रहिवासी होता. तो बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. दोन दिवसांपूर्वी कामावर गेला मात्र घरी परतला नाही. सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधा शोध करून मिळून न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पारडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ

शुक्रवारी रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तो मृतदेह सतीशचा असल्याचं निशपन्न झालं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सतीशची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हत्येमागचे नेमके काय कारण आहे? सतीशची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा शोध पारडी पोलीस घेत आहे. सतीशची हत्या केली असल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबाने आक्रोश व्यक्त केला असून, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply