Maharashtra : “ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!

 

Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अर्थातच याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अपवाद नाहीत. ते त्यांच्या सभांमधून विरोधकांवर हल्लोबोल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे राजकारणाबरोबर राज ठाकरेंच्या बाहेरील जीवनाची तुफान चर्चा सुरू आहे. खरं तर राज ठाकरे यांनी कर्लीटेल्स या युट्यूब चॅनेलला नुकताच मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक आठणवींना उजाळा दिला आहे. तसेच स्वित्झर्लंड मधील एक भन्नाट किस्साही सांगितला.

राज ठाकरे यांना या मुलाखतीत, तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले, नक्कीच मला फिरायला आवडतं. “मी देशातही बऱ्याच ठिकाणी फिरतो, अनेकदा परदेशातही जाणं होतं. कारण तिथे एक शांतता असते. लोक तुमच्या बाजुला गराडा घालत नाहीत”. यावरच आजकाल परदेशातही भारतीयांची संख्या वाढली आहे, तर ते तुम्हाला ओळखत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला.

Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी मी परदेशात जातो, तेव्हा माझी वेशभूषा बदलेली असते, दाढी वाढलेली असते, जॅकेट आणि टोपी घातलेली असते, त्यामुळे सहसा लोक ओळखत नाही. पण एकदा मी स्वित्झर्लंडला गेलो होतो. तिथे एका ठिकाणी पायऱ्यावरून उतरत असताना मला समोर वडापावचं हॉटेल दिसलं. मी तिथे गेलो, आतामध्ये मी चहा पित असताना एक व्यक्ती माझ्याजवळ आली, त्याने मला विचारलं की राज ठाकरे ना? मी होत म्हटलं, तेवढ्यात तो जोरात ओरडला, ‘ए आजी बघ तुला बोललो ना राज ठाकरे आहेत’. त्याने असं ओरडताच, सगळी लोक माझ्याकडे बघायला लागली.”

पुढे राज ठाकरे म्हणाले, “ती व्यक्ती ओरडून थांबली नाही, त्याने बाहेर जाऊन तिथल्या सगळ्या मराठी लोकांना ओरडून सांगितलं की राज ठाकरे आले आहेत, तेही खरे..त्याने खरं राज ठाकरे म्हटल्यावर सगळ्यांनाच हसू आलं, मुळात बाहेर देशात गेल्यावर लोक ओळखतात, पण त्रात देत नाहीत”, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply