'चुलीवरच्या बाबा'नंतर मार्केटमध्ये आला 'पाण्यावर तरंगणारा बाबा'; दर्शनासाठी अख्ख गाव जमलं

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गरम, तापलेल्या तव्यावर बसलेल्या बाबाची जोरदार चर्चा सुरू होती. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत होता. त्यानंतर आता पाण्यावर अधांतरी तरंगणाऱ्या बाबाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हिंगोलीमधील एक व्यक्ती पाण्यावर हातपायही न हलवता तरंगताना दिसत आहे. या बाबाला पाहण्यासाठी आता मोठी गर्दी जमू लागली आहे. अनेक लोक याला चमत्कार समजत दर्शनाला येत आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या बाबाला आव्हान दिलं आहे.

हिंगोलीतल्या दुर्गसावंगी इथल्या सिरसम गावामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे. या सप्ताहादरम्यान भाविकांनी या बाबाला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. आपण हातपाय न हलवता पाण्यावर तरंगू शकतो, असं या बाबाचं म्हणणं आहे. १४ महिन्यांचा उपवास आणि देवाचं नामस्मरण केल्याने हे शक्य झाल्याचंही या बाबाने म्हटलं आहे.

मात्र, हा योगाचाच एक प्रकार असल्याचा दावा काही जण करत आहेत. फुफ्फुसांमध्ये मोठा श्वास घेऊन हवा भरून घेतली की पाण्यावर तरंगणं शक्य आहे, असं काही जणांचं म्हणणं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply