Mahakumbh cylinder blast : महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी

Mahakumbh cylinder blast : महाकुंभमेळ्यात झालेल्या सिलिंडर स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. दहशतवादी संघटनेनं याबाबात काही माध्यम संस्थांना ई- मेल पाठवला आहे. ज्यामध्ये पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचं त्यात म्हटलं आहे. हा स्फोट म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेला इशाराच आहे, ही तर सुरूवात आहे, असं त्या ई- मेलमध्ये म्हटलंय.

प्रयागराज येथे महाकुंभमेळा आहे. या ठिकाणी लाखो भाविक येतात. नियमित हजारो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होतात. रविवारी महाकुंभ मेळ्यामध्ये आग लागली होती. सेक्टर १९ - २०मध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये स्वयंपाक करताना आग लागल्याची माहिती आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका पाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग पसरत गेली आणि आगीनं विक्राळ रूप धारण केलं होतं. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Harsul Police : तीन वर्षानंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; कायद्याचा दुरुपयोग करत ज्येष्ठ नागरिकाला केली होती मारहाण

आता या आगीबाबत दहशतवादी संघटना खलिस्तान जिंदाबाद फोर्सनं मोठा दावा केला आहे. त्यांनी कॅनडा आणि पंजाबच्या मीडियाला एक ई - मेल पाठवला आहे. ज्यात त्यांनी प्रयागराजमध्ये लागलेल्या आगीची जबाबदारी घेतली आहे. ई - मेलमध्ये संघटनेनं सांगितले की, त्यांचा हेतू कुणाला हानी पोहोचवणे नसून, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी एक अलर्ट आहे.

ही तर फक्त सुरूवात आहे. अशा आशयाचं ई-मेल पाठवण्यात आलं आहे. ई-मेलमध्ये फतेह सिंह बागी यांचं देखील नाव लिहिलेलं आहे. दरम्यान हा स्फोट पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचं दहशतवादी संघटनेनं म्हटलं आहे.

युपी पोलीस काय म्हणाले?

उत्तर प्रदेश पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत विशेष डीजीपी म्हणाले, ही घटना उत्तर प्रदेशची आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे. यावर बोलणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply