Mahadev Koli Samaj : बुलढाण्यात महादेव कोळी समाज युवक आक्रमक, न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदाेलन

Mahadev Koli Samaj : आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आजही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर समाज बांधवांनी जाेरदार निदर्शने केली. युवकांनी, विद्यार्थ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेत न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनास दिला.

आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर समाज बांधवांच्या वतीने गेल्या दोन जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाची प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही.

Maratha Reservation : सरकारचा तीन कलमी प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला

यामुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे आंदाेलनात सहभाग घेत जोरदार निदर्शने केली. यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला.

प्रमाणपत्र घेऊनच आंदाेलन थांबेल

विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत मागण्यांची घाेषणाबाजी केली. अधिकारी जागेवर सापडत नसल्याची तक्रार विद्यार्थी यांची हाेती. शासन आंदोलनाची दखल घेऊन प्रमाणपत्र वितरित करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply