Mahadev Jankar : ना माढा, ना बारामती.. महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला? लवकरच होणार अधिकृत घोषणा

Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चढाओढ होताना दिसत आहे. या सगळ्या राजकीय पेचात महादेव जानकर यांचं नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे.

महादेव जानकर यांनी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली. या भेटीनंतर महादेव जानकर महायुतीतून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय. मात्र मतदारसंघ कोणता हे अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. 

Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील ९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान

महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा सोडण्यास शरद पवार यांनी सहमती दर्शवली होती. तर महायुतीत सामील झाल्यानंतर महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढतील अशीही चर्चा सुरु होती. मात्र आता महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे.

महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातूनच रासपच्या चिन्हावरती महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतील. महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत ⁠लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. ⁠इतर लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर निवडणूक लढणार, या बातम्यांमध्ये तथ्य नाही, अशी माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष ⁠काशिनाथ शेवते यांनी दिली आहे.

मित्र पक्षाला जागा दिल्यास पराभवाची भीती- बबनराव लोणीकर

परभणी लोकसभेची जागा भाजपने कमळ या चिन्हावर लढल्यास दोन लाख मतांच्या फरकाने जिंकेल, असा दावा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. मात्र मित्रपक्षाला ही जागा देण्याचा चुकीचा निर्णय झाल्यास, ही जागा हातातून जाण्याची भीती आमदार लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.

...तर उद्धव ठाकरे गटाला मदत होईल

भाजपकडे प्रबळ, प्रभावी, सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे बाहेरचा उमेदवार लादू नये ही मतदारांची भावना आहे. मित्रपक्षाला ही जागा देणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे गटाला मदत करणे, असं होईस असंही बबनराव लोणीकर यांनी म्हटलं.

परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ३ आमदार, १७ जिल्हा परिषदेचे सदस्य, ६५ पंचायत समितीचे सदस्य, ९२ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य असून २ हजार २५० बूथवर भाजपाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत संघटन मजबूत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रबळ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने मित्रपक्षांऐवजी स्वतःचा उमेदवार उभा करावा, असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply