Mahad MIDC News : महाड MIDC दुर्घटना! चौथ्या दिवशी आणखी २ मृतदेह सापडले; मृतांचा आकडा ९ वर

Mahad MIDC News : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी येथील ब्लू जेट हेल्थकेअरमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचे मृतदेह सापडले असून ३ बेपत्ता कामगारांचा गेल्या दोन चार दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर आज चौथ्या दिवशी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. यासोबतच मृतांची संख्या आता ९ वर पोहोचली असून दोन मृतांचा शोध सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला. वायू गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून४ कामगार अद्यापही बेपत्ता होते. घटनेनंतर गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता कामगारांचा शोध सुरु होता. मात्र स्फोटामुळे इमारत धोकादायक बनल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.

Manoj Jarange Patil : 'अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा'; मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी

अखेर आज अपघाताच्या चौथ्या दिवशी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. आग आणि स्फोटामुळे इमारती धोकादायक बनल्याने असल्याने बचाव पथकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बचाव कार्यात बदल करत आला होता. आज दोन मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांचा आकडा नऊ झाला असून दोन बेपत्ता कामगारांचा शोध सुरु आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेने मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आमि विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख रुपये, अशी एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार भरत गोगावले यांनी दिले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply