Madrasa Removed In Pawangad : पावनगडावरील मदरसा पाडकामास सुरुवात; कोल्हापूरमध्ये संचारबंदीचे आदेश लागू

Madrasa Removed In Pawangad : कोल्हापुरमधील  पावनगड परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आलीये. आज रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.पाडकाम पूर्ण होईपर्यंत माध्यमांना देखील जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावन गडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रियेला सुरुवात झालीये. बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते. अरबिया जिणातुल कुराण असं बेकायदेशीर मदरसाचं नाव आहे. पावनगडावर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Raj Thackeray : मराठी माणूस एकत्र राहू नये हा बाहेरच्यांचा कट, तुमच्या जमिनीचा तुकडा गेल्यास तुमचं अस्तित्त्व संपेल

मदरसा पाडणार असल्याने येथील ४५ विद्यार्थ्यांना काल रात्री शिरोलीमधील मदरसामध्ये हलवलंय. हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाडकामाच्या कारवाईला सुरूवात केलीये. काल रात्रीपासून प्रशासन कारवाईसाठी पावनगडावर दाखल आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभा राहिला असल्याच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply