Madhya Pradesh : कॉंग्रेस नेत्याचा स्टेजवर फिल्मी स्टाईल गोळीबार ; अमिताभ बच्चन यांच्या 'मैं हूँ डॉन' गाण्यावर नाचत केली भाईगिरी

मध्य प्रदेशच्या एका कॉंग्रेस नेत्याने नवीन वर्षाचे स्वागत करताना हवेत गोळीबार केला आहे. अनुप्पूर जिल्ह्यातील ही घटना असून सुनील सराफ असे गोळीबार केलेल्या आमदाराचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

भोपाळपासून ५७० किमी अंतरावर असलेल्या अनुप्पूर जिल्ह्यातील कोतमा येथे ३१ डिसेंबर रोजी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील सराफ यांनी अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील गाण्यावर ताल धरला. व्हायर होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे.

मैं हूँ डॉन या गाण्यावर नाचत असताना त्यांनी आपले पिस्तूल बाहेर काढले आणि स्टेजवर चढून हवेत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच कोतमा पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. तसेच सुनील सराफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेची माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना समजताच त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशात यामध्ये वापरलेली बंदूक फटाक्यांची असल्याचा दावा आमदार सुनील सराफ यांनी केला आहे. सध्या त्यांनी केलेल्या गोळीबाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *