Mahendra Singh Dhoni Captaincy : भारतीय पुरुष क्रिकेट टीममध्ये असे काही खेळाडू होऊन गेले जे मैदानावर येताच धावांचा पाऊस पाडत. या खेळाडूंचे चाहतेही लाखोंमध्ये होते. यातील काही खेळाडू तर आजही तेवढेच लोकप्रिय आहेत.या खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतलेला असला तरीही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अजूनही लोकांची तेवढीच गर्दी होते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला महेंद्रसिंह धोनी हा अशाच काही खेळाडूंमध्ये शीर्षस्थानी आहे. सध्या तो भारतीय संघाकडून खेळत नाही. तो फक्त आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना दिसतो. परंतु त्याचे आजही लाखोंनी चाहते आहेत. आता याच महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाविषयी वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. महेंद्रसिंह धोनीने स्वइच्छेने कर्णधारपद सोडले नव्हते. त्याला हे पद सोडण्यास भाग पाडले होते, असा खळबळजनक दावा केला जातोय.
महेंद्रसिंह धोनीने त्याचे कर्णधारपद कसे सोडले?
कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचा भाग असलेले जतीन परांजपे नुकतेच ‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात त्यांनी महेंद्रसिंह धोनीने त्याचे कर्णधारपद कसे सोडले? याबाबतचे काही खुलासे केले आहेत. इंग्लंडविरोधातील सामन्यांच्या अगोदर महेंद्रसिंह धोनीने 4 जानेवारी 2017 रोजी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट प्रकारातील संघाचे कर्णधारपद सोडले होते. महेंद्रसिंह धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील कर्णधार म्हणून चोख जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
महेंद्रसिंह धोनीने 2015 सालाचा विश्वचषक आअि 2016 सालचा टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर 2017 साली त्याने एकदिवसीय आणि टी-20 प्रकारातील भारतीय संघाचे कर्णधारपदही सोडले होते. याबातच परांजपे यांनी सविस्तर सांगितले आहे. धोनीला कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते, असेच त्यांनी अप्रत्यक्षणे सांगितले आहे. “महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करत होता. त्याने साधारण तासभर फलंदाजी केली. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो. कर्णधारपदाबाबत त्याला सन्मानजनक पद्धतीने सांगायला हवे, असे आम्ही ठरवले होते. आम्ही धोनीजवळ गेलो आणि आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे आम्हाला वाटत आहे, असा संदेश आम्ही धोनीला दिला,” अशी माहिती परांजपे यांनी दिली.
वेगवेगळ्या चर्चांना उधाण
त्यानंतर धोनीनेदेखील हा निर्णय योग्य आहे, असे सांगितले. त्यानंतर मी कर्णधारपद सोडणार आहे, असे तुला लिहून द्यावे लागेल, असे आम्ही धोनीला सांगितले. त्यानंतर रात्री धोनीचा एक मेल आला. त्यात मला कर्णधारपद सोडायचे आहे, असे लिहिलेले होते असे परांजपे यांनी सांगितले. दरम्यान, परांजपे यांच्या याच दाव्यामुळे धोनीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा केला जातोय. वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

