IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Lucknow : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सपाटून मार खावा लागत आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई संघावर चार विकेट राखून विजय मिळवला. लखनौचा हा सहावा विजय ठरला. मुंबईला सातव्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशांना सुरुंग लागला आहे. मार्कस स्टॉयनिसची (६२ धावा व १/१९) अष्टपैलू चमक लखनौच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.

मुंबईकडून लखनौसमोर १४५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. नुआन तुषाराच्या गोलंदाजीवर अर्शिन कुलकर्णी शून्यावर बाद झाला; पण त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल (२८ धावा) व मार्कस स्टॉयनिस (६२ धावा) यांनी लखनौसाठी ५८ धावांची भागीदारी रचली; पण राहुल, स्टॉयनिस व दीपक हूडा (१८ धावा) हे बाद झाल्यानंतर ॲश्‍टन टर्नर व आयुष बदोनीलाही अपयश आले. अखेर निकोलस पूरन (नाबाद १४ धावा) व कृणाल पंड्या (नाबाद एक धाव) यांनी लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Hardik Pandya : कर्णधार पांड्यावर लागणार बंदी; BCCI ने हार्दिकसह संपूर्ण मुंबई संघांवर घेतली मोठी ॲक्शन

 मुंबई इंडियन्स - २० षटकांत ७ बाद १४४ धावा (नेहल वधेरा ४६, टीम डेव्हिड नाबाद ३५, मोहसिन खान २/३६) पराभूत वि. लखनौ सुपर जायंटस्‌ १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा (मार्कस स्टॉयनिस ६२, हार्दिक पंड्या २/२६).त्याआधी मुंबईच्या फलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. इशान किशन (३२ धावा), नेहल वधेरा (४६ धावा) व टीम डेव्हिड (नाबाद ३५ धावा) यांनी थोडीफार चमक दाखवल्यामुळे मुंबईला सात बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहसिन खानने दोन, तर मयंक यादव, नवीन उल हक, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्‍नोई यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply