LPG Cylinders Price : मोदी सरकारची 'रक्षाबंधन' भेट! घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार,

Gas Cylinder Price Reduce: महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घरगुती गॅस दरात मोठी कपात करण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल. १ तारखेपासून हे नवे दर लागू होतील.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची (एलपीजी किंमत) 200 रुपयांनी कपात केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

दरम्यान, गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply