पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात दोन ठार, दोन जखमी

Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरज गावाच्या हद्दीत पहाटे अडीचच्या सुमारास टेम्पो आणि मोटार यांच्यातील भीषण अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.

जनार्दन वामन सावंत (वय ६१) आणि श्रीकांत मुरलीधर सावंत (वय ४८ दोघेही रा. मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर, अश्विनी राणे आणि आर्य श्रीकांत सावंत (वय २०) हे दोघे जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर आडवा झाला. यावेळी मागून येणाऱ्या मोटारीची टेम्पोला मधोमध धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. जखमींवर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश माने तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply