Lonavala News : लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Lonavala - महाराष्ट्राची पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा व खंडाळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. दाट धुके आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत वर्षाविहारासाठी रविवारी पर्यटकांची गर्दी दिसत होती.
लोणावळ्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, येथील थंड व आल्हाददायी वातावरणासह वर्षाविहाराचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. पर्यटन हा लोणावळा आणि खंडाळ्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.

शनिवार, रविवार सुट्यांमुळेही वर्षाविहरासाठी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. लायन्स पॉइंट, राजमाची उद्यान, भुशी धरण, भाजे लेणी, धबधबा, कार्ला लेणी पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉइंट पर्यटकांच्या गर्दनि दिवसभर गजबजून गेली होती, पवना परिसरालाही पर्यटक भेटी देत आहेत. गेल्या रविवारी भुशी येथे घडलेल्या दुर्घटनेचे सावट या वीकेंडला पर्यटनावर होते.

Sandalwood : महसूल गुप्तचर यंत्रणेने आठ कोटींचे रक्तचंदन पकडले; नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात कारवाई

पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली असून, पर्यटकासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी लोणावळा पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते. पर्यटकानी आपला मुक्काम खासगी बंगले आणि ग्रामीण भागाकडे वळविला आहे येथील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते आहे

मात्र, वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनांना कुठेही थांबण्यास पोलिसांच्यावतीने मनाई करण्यात येत आहे. पर्यटनस्थळी बंदोबस्त आणि वाहतूक नियत्रणासाठी लोणावळा परिसरात सात अधिकारी, ७० पोलिस कर्मचारी आणि ३० स्वयसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सायंकाळी पाचनंतर प्रवेश नाही

वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून, भुशी धरण, लोहगड किल्ला, भाजे, लायन्स पॉइंट आदी पर्यटन स्थळांवर खबरदारी घेण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर याठिकाणी पोलिसांच्या वतीने पर्यटकांना मनाई करण्यात येत आहे. देवळे रस्ता, भाजे तसेच भुशी परिसरात वाहनांच्या काहीकाळ रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply