Loksabha Election 2024 : भाजपचा बारामती, राज्यातही पराभव होणार ; आमदार रोहित पवार यांचा भोरमध्ये दावा

Loksabha Election 2024 : ‘‘मलिदा गँग भाजपासोबत गेली असली तरीही जनता महाविकास आघाडीच्या विचारांसोबतच आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबर राज्यातही भाजपला पराभव स्वीकारावा लागेल,’’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त भोर येथे गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शिवसेनेचे कुलदीप कोंडे आदी प्रमुख मान्यवरांसह आघाडीच्या घटकपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Vasant More : पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!

रोहित पवार म्हणाले, ‘‘भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद कमी करायची आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाबरोबर घरे फोडण्याची कामे केली आहेत. भोरच्या एमआयडीसीबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु, स्थानिकांचा छुपा विरोध झाल्याचे मला समजले. भोरच्या एमआयडीसीबाबत मला अधिक अभ्यास करावा लागणार आहे. आता इतिहासात जाण्यापेक्षा यापुढे एमआयडीसीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करता येतील. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. ते विचारांचे पक्के आहेत आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. मी आमदार संग्राम थोपटे यांचेही योग्य त्या वेळी मार्गदर्शन घेतो.’’

मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर हे उमेदवार उभे करून अप्रत्यक्षरीत्या भाजपला फायदा करून देतील. त्यामुळे त्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. बारामती मतदारसंघात विजय शिवतारे यांना दबाव टाकायचा असेल किंवा वाटाघाटी करायच्या असतील म्हणून त्यांचे उमेदवारीचे धोरण अवलंबले होते का? हेदेखील लवकरच समजेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply