Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत अर्धा डझन जागांवर तिढा, मुंबईतील दोन जागांचाही समावेश

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आणखी एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक जागांवर चर्चा झाली. मात्र काल झालेल्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये सुमारे अर्धा डझन जागांवर तिढा निर्माण झाला आहे. नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी आणि शिर्डी या जागांवर दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेसला मुंबईतील दोन जागा देखील हव्या आहेत.

⁠Manoj Jarange Patil : 'मी बारावी पास...'; छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं रोखठोक उत्तर, म्हणाले...

काँग्रेस मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघासाठी आग्रही आहे. या जागांवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत.  

या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे गटाचे खासदार विजयी झाली होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा दिल्लीतील तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे मांडला जाईल.

वंचित अधिकृतरित्या महाविकास आघाडीत

बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं. त्यानुसार वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती.

त्यानुसार ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply