Lokayukta Raid : सत्तेत असणाऱ्या भाजप आमदाराच्या घरावर धाड; तब्बल ६ कोटी रक्कम जप्त; लाचखोर मुलगाही अटकेत!

बेंगळुरू : निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आलीये. इथं बेंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्डचे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. या कारवाईनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा  यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आलीये.

आमदार विरुपक्षप्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलानं 40 लाख रुपयांची लाच घेतल्यामुळं त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली असून 6 कोटी रुपयांची रक्कम जप्त केलीये. तर, मुलाच्या कार्यालयातून 2 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. कर्नाटकात सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्यानं भाजप नेत्यांवर लाचखोरीचा आरोप करत आहे. या कारवाईमुळं भाजप बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply