Lok Sabha Election Duty : इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी ४०० हून अधिक जणांचे अर्ज

Lok Sabha Election Duty : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र काहींना ही ड्युटी नको असल्याने काहींना काही बहाणे शोधत आहेत. यासाठी अर्ज देखील सादर केले आहेत. यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आजवर ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत.  

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडून याकरिता ड्युटी लावण्यात आली आहे. ड्युटी लावलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. परंतु या ड्युटीला अनेकांचा विरोध आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी इलेक्शन ड्युटी रद्द  करण्यासाठी बोगस मेडिकल प्रमाणपत्राचाही आधार घेतल्याची माहिती समोर आली होती. परंतु बोगस मेडिकल प्रमाणपत्र देऊन जर कोणी ड्युटी रद्द करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करन्याचा इशारा दिला होता. यानंतर देखील वेगवेगळी करणे दाखवून ही अर्ज सादर केले आहेत. 

Jayant Patil : शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार नव्हते; पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

बारकाईने होणार तपासणी 

त्यासाठी "एक से बढकर एक" अशी भन्नाट कारणे देखील दिल्याची माहिती समोर आली आहेत. या अर्जानुसार कुणाची बायको, आई आणि मुले आजारी असल्याचे कारणांसह अर्ज दिलेले आहे. मात्र मेडिकलशी निगडित प्रकरणांची बारकाईने तपासणी करून प्रशासन निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply