Lok Sabha election : मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Lok Sabha election : आज ओक्सभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवरही मतदान होणार आहे, जिथून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत.

या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे. या फेरीत 4.26 कोटी महिला मतदारांसह 8.95 कोटींहून अधिक लोक मतदान करणार आहेत. 94,732 मतदान केंद्रांवर 9.47 लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Sinhagad Fort Pune : सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

राज्यात 13 जागांवर आज होणार मतदान

  • आज राज्यातील 13 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्येच कुठल्या जागेवरून कोणाची कोणाशी लढत आहे, हे जाणून घेऊ...

    दक्षिण मुंबई -

    अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)

  • उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) विरुद्ध रवींद्र वायकर (शिंदे गट)

  • दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

  • ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)

  • उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)

  • उत्तर मुंबई - पियूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

  • कल्याण - श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

  • ठाणे - नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

  • पालघर - भारती कामडी (ठाकरे गट) विरुद्ध हेमंत सावरा (भाजप) विरुद्ध राजेश पाटील (बविआ)

  • भिवंडी - कपिल पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (शरद पवार गट)

  • धुळे - सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस)

  • नाशिक - हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाझे (ठाकरे गट)

  • दिंडोरी - भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे (शरद पवार गट)

दरमयान, आज राज्यातील 13 जागा व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, ओडिशातील 5, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्यापैकी 40 हून अधिक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) होत्या.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply