Lok Sabha Election : सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी, बारामतीत सर्वात मोठा ट्विस्ट!

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या   तिसऱ्या टप्प्यात सर्वात मोठा ट्विस्ट बारामतीत पाहायला मिळाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या. अजित पवार आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत, त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. 

सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधीक आहे. कारण या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारांवर होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील.

Sharad Pawar : शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान

सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी

बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता त्या अजितदादांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतरच या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.

भेटीचा मतदानावर काय परिणाम?

बारामतीमध्ये मतदान सुरु होऊन अवघे चार तास उलटले आहेत. मतदानाचे आणखी सात तास शिल्लक आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार  यांच्या भेटीचा मतदानावर काय परिणाम होणार, हे आता पाहावे लागेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply