Lok Sabha Election 2024 : माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरियांचा भाजपमध्ये प्रवेश, लोकसभेचं युद्ध लढणार!

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशचतच्या गाझियाबादमधून भाजप त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरकेएस भदौरिया यांनी 30 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत हवाई दल प्रमुखपद भूषवले आहे. ते देशाचे 23 वे हवाई दल प्रमुख होते. भदौरिया हे मूळचे आग्रा जिल्ह्यातील बह तहसीलचे रहिवासी आहेत.

Mobile Phone Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; घराला आग लागून ४ मुलांचा मृत्यू, पती-पत्नी गंभीर


लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करू शकते. वरुण गांधी, संघमित्रा मौर्य आणि व्हीके सिंह यांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे. सुलतानपूरमधून मनेका गांधींना पुन्हा रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

तर संभलपूरमधून धर्मेंद्र प्रधान, पुरीतून संबित पात्रा आणि भुवनेश्वरमधून अपराजिता सारंगी यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दोन विद्यमान खासदार विश्वेश्वर तुडू आणि प्रताप सारंगी यांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अशा स्थितीत शनिवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक तब्बल 3 तास चालली. या बैठकीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सीईसी सदस्य उपस्थित होते. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply