Lok Sabha Election : लोकसभेसाठी काँग्रेस ठाकरे गटाला पाचपेक्षा जास्त जागा देणार नाही, नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

Lok Sabha Election : ठाकरे गट लोकसभेच्या   23 जागा लढण्यावर ठाम आहे. याआधीही आम्ही 23 जागांवर लढलोय, काँग्रेसलाच शून्यापासून सुरूवात करायची आहे असा टोला खासदार राऊत यांनी मारला. त्यावर जागावाटपाची चर्चा हायकमांडसोबतच होईल असं वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय. ठाकरे गटाच्या 23 जागांच्या मागणीची नितेश राणेंनी खिल्ली उडवली. काँग्रेस ठाकरे गटाला पाच जागाही देणार नाही असा टोला नितेश राणेंनी   मारला. 

नितेश राणे म्हणाले, 22 तारखेचा अयोध्येचा कार्यक्रम मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी जावं, कुणी पूजा अर्चा करावी, कोणी रामाचे दर्शन घ्यावे हे समितीने ठरवले आहे. त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवली आहे. तू जर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेले त्याचे संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाले करा. हा परत याच्या दोन पायावर घरी जाणार नाही याची काळजी हिंदू समाज आणि कार्यकर्ते निश्चितपणे घेतील.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा

ठाकरे गटाकडे 23 माणसे नाहीत : नितेश राणे

काँग्रेसने यांच्याकडे ढुंकून देखील बघितले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काँग्रेस पक्ष पाच जागेपेक्षा जास्त जागा देत नाही अशी माझी माहिती आहे. जे दुपारचे सामनाचे पहिले संपादक होते ते पण आजकाल यांची लायकी काढू लागलेत की यांच्याकडे 23 माणसे नाहीत. भाजपबरोबर यांची युती होती तेव्हा अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते.  मुख्यमंत्री असूनही  देवेंद्र फडणवीस  यांच्यासोबत चर्चा करायचे. उद्धव ठाकरे तेव्हा मध्येच उठून जायचे आणि आदित्य आणि वरूण सरदेसाईला चर्चेला बसायचे, कधी कधी तो श्रीधर पाटणकर देखील येऊन चर्चेला बसायचे. आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत, खर्गे पण यांना वेळ देतील का? हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे, असे नितेश राणे म्हणाले. 

काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले : नितेश राणे

कोणीही काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले ही यांची लायकी आहे. म्हणून उगाच 23 ची वलग्ना करण्यापेक्षा पाच जागा ज्या मिळणार त्या घ्या आणि गप्प बसा, असे नितेश राणे म्हणाले. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply