Lok Sabha Election : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

 Lok Sabha Election : हिंगोली लोकसभा मतदारसंघात  भाजपाचे काम चांगले आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा अशी मतदारसंघातील अनेकांची मागणी आहे. ही मागणी आता हिंगोलीचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

हिंगोली भाजपाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज (साेमवार) नांदेड विमानतळावर दाखल झाले. या शिष्टमंडळामध्ये भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, आमदार भीमराव केराम, आमदार नामदेव ससाणे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन गुघे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.

Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 30 लाखाची दारू जप्त, वाहन चालक फरार

हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील  यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपाने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. भाजपाने हिंगोली लोकसभेसाठी गत पाच वर्षात चांगली तयारी केली आहे. आम्ही लोकसभेची जागा निश्चित निवडून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

भाजपचे काम हिंगोली लोकसभा मतदारसंघात चांगले आहे. भाजपचा उमेदवार या मतदारसंघात हवा अशी मागणी हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नमूद केले. त्यासाठी ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आमदार मुटकुळे हे उमेदवार बदलण्याची मागणी फडणवीस यांना करणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply