Lok Sabha Election : 'माझी ही शेवटीची निवडणूक असेल...', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

शिवसेना पक्षाशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले. शिवाय आपली ही शेवटची निवडणूक असून आपण जिंकून येणारच, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

Prakash Ambedkar : 'वंचित' लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार; प्रकाश आंबेडकर अकोल्यातून रिंगणात, ९ उमेदवार जाहीर

लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकिटासाठी थोडा संघर्ष करावा लागला हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. त्यामुळे यावेळी ते थोडे भावनिक सुद्धा झाले. 

मात्र, आता तिकीट मिळाल्यानंतर अंबादास दानवेही विरोधात काम करणार नाही, ही शिवसेनेची पद्धत आहे. तिकीट मिळाल्यावर सगळे जोमाने काम करतात तसे जोमाने काम करू. आम्ही निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply