Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

Lok Sabha Election : मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याची ध्येय महायुतीने ठेवलं आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागा जाहीर केल्या तरी शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आज शिंदे गट १४ जागा लढवणार असून १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे.

मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय. रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे आणि कोल्हापूचे खासदार संजय मंडलिक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सर्व्हेत या तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात आहे असल्याचं समोर आलं होत. तर पालघरचे राजेंद्र गावीतहे भाजपमधून आलेले उमेदवार आहेत, त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात.

Sangli News : व्हेल माशाच्या उलटीसह काेकणातील तिघांना मिरजेत अटक, 19 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी?

१) हेमंत पाटील , हिंगोली

२) श्रीरंग बारणे, मावळ

३) भावना गवळी, वाशिम ( यांना मिळू शकतो डच्चू यांच्या जागी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते )

४) धैर्यशील माने, हातकणंगले

५) सदाशिव लोखंडे, शिर्डी

६) हेमंत गोडसे, नाशिक

७) कृपालजी तुमाणे, रामटेक (यांना मिळू शकतो डच्चू )

८) श्रीकांत शिंदे, कल्याण

९) राहुल शेवाळे, इशान्य मुंबई

१०) राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असु शकतात )

११) प्रतापराव जाधव, बुलढाणा

१२) संजय मंडलिक, कोल्हापूर ( यांना मिळू शकतो डच्चू )



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *