Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना, जुन्नरमध्ये संरक्षणासाठी मेंढपाळांना सोलर लाईटसह टेन्ट

Leopard Attack : गाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे बिबट्याकडून हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. याच दरम्यान जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनक्षेत्र परिसरात बिबट्याच्या संरक्षणासाठी मेंढपाळांनी सोलर लाईटसह टेन्ट देण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यातील इटोली गावातील राजाराम खुणे, विठ्ठल मोगरे, शिवाजी शेळके या पशुपालकांचा शिवारात शेत आखाडा आहे. शेती व शेळी पालनातून ते उदरनिर्वाह करतात. दरम्यान, रात्री नियमितपणे शेळ्या चारून एकाच ठिकाणी शेत आखाड्यावर त्या बांधल्या होत्या. दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यात १२ शेळ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज सकाळी पशुपालक शेळ्यांची पाहणी करण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे पशुपालकांमधून भीती व्यक्त होत असून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येत आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply