
Laxman Hake News : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचं म्हणाले. अशात ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत, माझ्याकडून हवं तर लिहून घ्या. तसंच जरांगे आणि शरद पवार यांची लाईन एकच असल्याचंही लक्ष्मण हाके म्हणाले.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
“मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरली आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांना, आई बहिणीवर शिव्या घालाव्यात ही काही निवडणूक लढवण्याची साधनं आहेत का?” असं लक्ष्मण हाके यांनी विचारलं आहे.
|
|
मनोज जरांगे निवडणूक लढवू शकत नाहीत
“मनोज जरांगेंनी जरी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असले तरीही माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या की मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत. ज्या मागण्या मान्य होणार नाहीत अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देऊ शकतात बाकी काहीही करु शकत नाहीत. निवडणुकीत कोणाच्या विरोधात त्यांनी प्रचार केला हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करतील, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेलही नाही शरद पवार आणि त्यांची एकच लाईन आहे असं लक्ष्मण हाकेंनी Laxman Hake म्हटलं आहे.
मनोज जरांगे आणि शरद पवारांची लाईन एकच
मनोज जरांगे यांना ओबीसी समाजात फूट पाडायची आहे, त्यांना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. ओबीसीमध्ये साडेतीन टक्के आरक्षण धनगर समाजाला मिळतं. सर्वाधिक वाटा असतानाही आम्ही ओबीसींच्या आरक्षणाबाबत का लढू नये, असा सवाल उपस्थित करत असतानाच ओबीसी आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र जरांगेचं असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगेंचं उपोषण मागे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेलं बेमुदत उपोषण स्थगित केलं आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून त्यांची प्रकृती ढासळल्याने बेमुदत उपोषण स्थगित केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच प्रकृती ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

