Laxman Hake : शिष्टमंडळाने घेतली हाके यांची भेट

 

Ankushanagar (ता. अंबड) : ओबीसी आरक्षण बचावसाठी वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची आज शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईला पाठविण्याचे हाकेंनी मान्य केले. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे स्पष्ट केले. दोघांच्या उपोषणाचा आज नववा दिवस होता.
मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार गोपीचंद पडळकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके उपस्थित होते. मुंबईला चर्चेसाठी येण्याचे आवाहन मंत्री महाजन यांनी हाकेंना केले. महाजन यांनी हाके यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे करून दिले.

Raigad News : पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, खालापूरजवळ धरणात बुडून मुंबईच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

'मी आजपर्यंत मागण्या मांडत आलो आहे. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सरकारने सांगावे. आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत उपोषण सुरुच राहील. आमचे शिष्टमंडळ मात्र चर्चेसाठी जाईल, असे हाकेंनी सांगितले. 'सरकार आपल्या पाठीशी उभे आहे. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत मागण्यांवर चर्चा करू. त्यासाठी तुमचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, चर्चा करून प्रश्न सुटेल', असे मंत्री महाजन यांनी हाकेंना सांगितले. 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याबाबतचे लेखी आश्वासन द्या, मागच्या दाराने निघालेली ५४ लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत' अशी मागणी वाघमारे यानी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply