Latur Politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षांचा पक्षाला रामराम

Latur Politics :  राज्यातील काँग्रेस पक्षातून आउट गोइंग मोठ्या प्रमाणात होत आहे. नांदेडमध्ये खिंडार पडले असताना आता मराठवाड्यात सुद्धा काँग्रेसला धक्का बसलाय. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम ठोकलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा दिलाय. येत्या २ दिवसांत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics : लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं, ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार; भाजपचं टेन्शन वाढणार?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस पक्षात गळती लागलीय. मुंबई, नांदेडमधील मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मराठ्यावाड्यातून सुद्धा मोठ्या नेत्यांने पक्षाची साथ सोडलीय. विशेष म्हणजे काँग्रेसला हा धक्का लातूरमध्ये बसलाय. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. मुंबईतील मिलिंद देवरा आणि त्यानंतर बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply