Latur News : लातूर पाेलिसांचा क्लबवर छापा, जुगार खेळणा-या 74 जणांवर गुन्हा दाखल, 2 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

Latur News : लातूर जिल्ह्यात तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून माेठी कारवाई केली. या कारवाईत चार राज्यातील 74 जणांवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पाेलिसांनी एकूण 2 कोटी 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने बेकायदेशिर रित्या जुगार अड्डा चालविणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या तांबाळा शिवारात परवानाधारक क्लबवर सहाय्यक पोलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठा फौज फाटा घेऊन रात्री 1 वाजता कारवाई केली. यामध्ये नियम तोडून जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातील 74 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Lok Sabha Election : भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही

सहाय्यक पोलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी कारवाई बाबत माहिती दिली. ते म्हणाले या कारवाईत 2 कोटी 28 लाख रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूरच्या औराद-शहाजानी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रसह अन्य राज्यातील असे एकूण 74 जणांवर गुन्हा नाेंदविला आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply