Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

Latur : लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थिनीला विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या जेवणातून विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

लातूर शहरातल्या औसा रोड भागातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहेत. जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थिनी निवासी वसतिगृहात राहतात. संस्थेकडूनच विद्यार्थिनींच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. शनिवारी रात्री विद्यार्थिनींनी नियमित जेवण केले.

Mumbai : मुंबईत मोठी दुर्घटना, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मात्र, जेवणानंतर त्यांना अचानक चक्कर, मळमळ, उलटी यासारखा त्रास जाणवू लागला. बघता-बघता ३० ते ३५ विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. त्यामुळे वस्तीग्रह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीला या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती व्यवस्थित स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांनी दिली. या संपूर्ण प्रकारामुळे पालकवर्गांमधून संताप व्यक्त केला जात असून वसतिगृहाच्या जेवणावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात येतंय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply