Latur Crime : दुचाकीवर बसवून शेतात नेलं, ३ मुलींसोबत भयंकर घडलं; आजोबांकडून लैंगिक अत्याचार


Latur Crime : लातूरमध्ये ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. गावातील ५५ वर्षीय व्यक्तीने या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. घटनेची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेलया माहितीनूसार, लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. गावामध्येच राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीने ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या तिन्ही मुली या व्यक्तीला आजोबा बोलतात. दुपारच्या सुमारास या व्यक्तीने या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून शेतात नेले. त्याठिकाणी त्याने तिघींवर देखील लैंगिक अत्याचार केले. ओळखीची व्यक्ती असल्यामुळे या मुली आजोबासोबत गेल्या आणि त्यांच्यासोबत भयंकर घडलं .

Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, किती रेल्वे लोकल रद्द?

लैंगिक अत्याचारानंतर आरोपीने मुलींना धमकी देखील दिली. याबाबतची माहिती घरी सांगितल्यास तुमचा जीव घेईल अशी धमकी आरोपी नराधमाने पीडित मुलींना दिली. मात्र घरी आल्यानंतर पीडित मुलींनी कुटुंबीयांना याबाबत सांगितले. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तात्काळ देवणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीवरून देवणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply