Latur Accident : कार- ट्रॅक्टरचा भीषण अपघात; चोघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ शिक्षकांचा समावेश

Latur Accident : तुळजापूर- औसा महामार्गावर रात्रीच्या सुमारास कार व ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भिषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तिन जण जिल्हा परिषदचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

लातूर जिल्ह्यातील तुळजापूर- औसा महामार्गावर हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली अपघात इतका भीषण होता की कारचे इंजिन बाहेर निघून काही दूर अंतरावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार पूर्णपणे दाबली गेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढल्यानंतर औसा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

Latur Breaking News : शालेय कार्यक्रमातील आसनव्यवस्था कोसळली, ४० हून अधिक विद्यार्थी जखमी

चौघांचा मृत्यू 

तुळजापूर- औसा महामार्गावर मध्यरात्री कार- ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बाबा पठान, जि. एम. बिराजदार, रनदिवे आणि राजू बागवान असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे समोर आली आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या पैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply