Latur : लातुरात भीषण अपघात, मालवाहून ट्रक थेट खड्डयात पलटी, २ जणांचा जागीच मृत्यू

 

Latur Accident News : लातूर जहीराबाद महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल खड्ड्यात पलटी झाली. यात ट्रक मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. संध्याकाळी सहा वाजताच्या आसपास कर्नाटकमधील (केए - ३५ सी- ९८४५) ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. लातूर जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बस्वकल्याणवरून लातूरच्या दिशेने सौर उर्जेचे लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

Pune News : लष्करात नोकरी लावण्याचं आमिष, २ तरूणांना तब्बल ५ लाखांना गंडवलं

ट्रक रोडवरून खाली गेल्यामुळे आतमधील लोखंडी अँगल कॅबिनवर आल्याने चुराडा झाला. केबिनमधील दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय. घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने अँगल बाजूला करून तिघांना बाहेर काढून रूग्नवाहीकेतून रूग्णालयात पाठवले.

मृत व्यक्तीबाबत अद्याप कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस जमादार सुनील पाटील यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच रोडवरील वाहतूक सुरळीत केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply