land Sliding : कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ गावांना भुस्खलनाचा धोका; गावांची होणार दिवसातून दोनदा पाहणी

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी इथं झालेल्या लँड स्लाइडिंग दुर्घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना लँड स्लाइडिंगचा धोका असल्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासनाच्यावतीने संबंधित गावांना बजावल्या आहेत.

कोल्हापूरची पंचगंगा नदीही इशारा पातळीकडे संथगतीने वाटचाल करत असून आजही कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर या ८८ गावांना अलर्ट जारी करण्यात आला असून संबंधितांना प्रशासनाने नोटीसाही बजावल्या आहेत. तसेच सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे जवान आणि एनडीआरएफची एक तुकडी आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

Irshalgad Landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ३ सख्ख्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबातील इतर सदस्यांचाही शोध लागेना!

दोन दिवस ऑरेंज अलर्ट 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील गावांची संख्या अधिक आहे. दरम्यान, उद्या आणि परवा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्टअसल्याने जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता, या ८८ गावांना दिवसातून दोनदा तलाठी, ग्रामसेवक किंवा सर्कल ऑफिसर यांनी भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply