Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे अधिष्ठाता पदमुक्त, सर्जन सस्पेंड

Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि ऑर्थोटिक्स सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी समितीला दोषी आढळलेत. त्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. तर डॉक्टर प्रवीण देवकाते यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजीव ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते यांच्या देखरेखीखाली ललित पाटीलवर उपचार होत होते. 

Mumbai Fire News : मुंबईच्या विलेपार्लेमध्ये इमारतीला भीषण आग, एका महिलेचा होरपळून मृत्यू

ललित पाटील फरार झाल्यानंतर दहा दिवसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर प्रवीण देवकाते दोषी आढळलेत. पोलीसही याप्रकरणी या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करू शकते, असं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, ललित पाटीलच्या चौकशीत त्याने अवैद्यरित्या किती संपत्ती कमावली याचे पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत. ड्रग्स प्रकरण अटक केल्यानंतर ललित हा वैद्यकीय कारण देत पुण्यातील ससून रुग्णालयात राहत होता. मात्र त्याठिकाणी तो मोठी रक्क देत होता, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

पोलीस तपासात अशी माहिती उघड झाली आहे की, ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील दर महिना 17 लाख रुपये देत होता. विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. ड्रग्स विक्रीच्या पैशातून ललित पाटील ससून रुग्णालय प्रशासनाला हे पैसे देत होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यातच आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून यात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply