Ladki Bahin Yojana : बोगस लाडकींवर गुन्हे दाखल होणार; फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी.जर तुम्ही लाडकी योजनेत नियमबाह्य लाभ घेत असाल तर तुमच्यावर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्या मंत्र्यांनी हा इशारा दिलाय आणि किती लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींची आता खैर नाही. कारण ज्यांनी नियम डावलून लाडकीचे पैसे लाटले आहेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. आणि असा इशारा दुसरा तिसरा कुणी नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलाय.

लातूर जिल्ह्यातमध्ये पाच लाख ९२ हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता. त्यातल्या तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद झाले आहेत.. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे अशाच बोगस लाडक्या बहिणींवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. तसंच फसवणूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय. नेमकं त्या काय म्हटल्या आहेत ते पाहूयात

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती; गणेश जयंतीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

बोगस लाडकींवर फौजदारी कारवाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात तब्बल ३० लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याचं सांगितलं जातंय. काही परराज्यातल्या महिलांनीही पैसे लाटल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर तिजोरीवर मोठा ताण आलाय. त्यामुळे सरकारनं या योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावलीय. त्यामुळे बहिणींनो तुम्ही नियमात बसत नसाल तर या योजनेचा स्वत:हून लाभ सोडा...अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply