Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट, आता लवकरच..

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या पैशांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र असं असताना देखील लाभार्थी महिलांना अजूनही जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. जानेवारीचा हाफ्ता कधी मिळणार? याची प्रतिक्षा आता लाभार्थी महिला करत आहेत. या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे आता लवकरच जानेवारी महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या हाफ्त्यासाठी सरकारने फंड उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खात्यामधून 98.25 कोटी रुपये हे महिला व बालविकास विभागाकडे हस्तंतरीत करण्यात आले आहेत.  सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास विलंब झाला आहे. मात्र आता निवडणुका संपल्या आहेत, तरी देखील अजूनही जानेवारी महिन्यांचा हाफ्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये. तसेच अनेक महिला पात्र असून आणि त्यांनी केवायसी करून देखील त्यांचे पैसे थांबवण्यात आले होते, त्यामुळे अनेक महिलांनी नाराजी देखील व्यक्त केली. दरम्यान याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. ज्या महिलांनी केवायसी केली, मात्र त्यांच्या केवायसीमध्ये काही चुका झाल्या आहेत, त्यांना त्यांची केवायसी अपडेट करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या महिलांनी आपली केवायसी अपडेट करून घ्यावी, असं आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *